एक काॅफी प्यायल्याने तुमची मरगळ जाते का?

    17-Sep-2020
Total Views |
 
fgncgfncghn_1  
 
सकाळी उठल्यावर अनेक जणांना पहिल्यांदा चहा हवा असताे, पण काहीजण मात्र काॅफी घेणे पसंत करतात. काही जणांना संध्याकाळी काॅफी हवीच असते. काॅफीची चव आवडते म्हणून काॅफी घेतली जात नाही, तर सकाळी उठल्यावर बऱ्याचदा केवळ सवयीचा भाग म्हणून काॅफी घेतली जाते. काही जणांना सकाळी उठल्यावर काॅफी घेतल्याने सुस्ती किंवा मरगळ जाते, असे वाटते, पण केवळ एका कपावर मरगळ जात नाही. मरगळ जाण्यासाठी आणि ऊर्जा निर्माण हाेण्यासाठी दाेन-तीन कप काॅफीही प्यायली जाते. मात्र, नीट विचार करून पाहा.काॅफी पिऊनही बऱ्याचदा थकल्यासारखे वाटत राहाते. असे का हाेत असेल? काॅफीतील कॅफेन हा घटक नैसर्गिकरीत्या ऊर्जा निर्माण करताे आणि मेंदूला चालना देताे. एकीकडे काहीजणांना कॅफेनमुळे ऊर्जा मिळते, तर दुसरीकडे काही जणांना ते त्रासदायक ठरते. कॅफेनमुळे डेनाॅसिन या घटकावर परिणाम हाेताे. हा घटक झाेपेशी संबंधित असल्याने झाेपेवर परिणाम हाेताे आणि झाेप येत नाही. हा परिणाम कॅफेत रक्तात मिसळल्यावर हाेऊ लागताे. काॅफी प्यायल्यानंतर 45 मिनिटांनी कॅफेन रक्तात पूर्ण शाेषले जाते. मात्र, कॅफेनमुळे रक्त 15 मिनिटे ते दाेन तासांत उसळू शकते. या काळात संबंधित व्यक्तीला काही चांगले परिणामही दिसतात. म्हणजे दक्षता वाढते, एकाग्रता वाढते आणि ऊर्जाही वाढते. मात्र, हे परिणाम कायमस्वरूपी नसतात. काही वेळातच यकृत शरीर स्वच्छ करण्यासाठी कॅफेन नष्ट करू लागते.काॅफीमुळे थकवा घालवायचा असेल, तर काही गाेष्टी करता येतात. काॅफीचे आराेग्याला काही फायदेही हाेतात. ते फायदे मिळवण्यासाठी काही गाेष्टी करता येतील.सुरुवातीला थाेडीशी डुलकी घ्या किंवा एक कप काॅफी घेतल्यानंतर दाेन ते तीन तासांनी आणखी एक कप काॅफी प्या. मात्र, पूर्ण दिवसांत 400 ग्रॅम कॅफेनपेक्षा अधिक कॅफेन तुमच्या पाेटात जाणार नाही, याची काळजी घ्या. कारण यापेक्षा जास्त कॅफेनमुळे हृदयावर परिणाम हाेऊ शकताे. याचा अर्थ 4 कप काॅफी किंवा 5 ते 6 कप ब्लॅक काॅफीपेक्षा अधिक कप काॅफी पिऊ नका. याशिवाय काॅफीमधील साखर, दूध यावरही लक्ष द्या. कारण काॅफीतील साखरेने रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे शक्यताे साखर न घालता ब्लॅक काॅफी प्यावी किंवा काॅफीत कमी दूध किंवा क्रीम घालावे.