सीटी स्कॅन चाचणीच्या दरनिश्चितीसाठी चारसदस्यीय समिती : राजेश टाेपे

    17-Sep-2020
Total Views |
 
Szbdxfrtnh_1  H
 
मुंबई, 16 सप्टेंबर (आ.प्र.) : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सीटी स्कॅ न चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आराेग्य विभागामार्फत राज्य आराेग्य हमी साेसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करेल, असे आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांनी सांगितले.आराेग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ.प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला. यापूर्वीही काेराेना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारावयाचे दर, तसेच खासगी प्रयाेगशाळांनी आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन, अँटी बाॅडीज चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहेत.काेराेना रुग्णांच्या तपासणीसाठी सीटी स्कॅनसारख्या चाचणीचीही आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सीटी स्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. डाॅ.
शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एलटी वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयाच्या रेडीओलाॅजी विभागप्रमुख डाॅ.
अनघा जाेशी, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य असून, आराेग्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.