
सुरत, 15 सप्टेंबर (वि.प्र.) : येथील आलीया फॅब्रिकचे मालक रजत डावर यांनी वेगळ्याच पद्धतीने कंगनाचे समर्थन केले आहे. त्यांनी या निमित्ताने मनकर्णिका प्रिंट साडी बाजारात आणली असून, या साडीवर कंगना आम्ही तुझे समर्थन करताे, अशा आशयाचा मजकूर आणि कंगनाचा फाेटाे प्रिंट केला आहे.या साडीचे लाॅन्चिंग आज हाेणार असून, त्यापूर्वीच डावर यांच्याकडे माेठ्या प्रमाणात या साडीसाठी ऑनलाइन ऑर्डर आल्या आहेत.या संदर्भात बाेलताना रजत म्हणाले, ‘कंगनाने काही वक्तव्ये केल्यावर तिच्याविराेधात महाराष्ट्र सरकारने केलेली कारवाई बराेबर नाही. तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हाेत आहे. जे घडते आहे ते चुकीचे आहे. आम्ही कंगनाचे समर्थन करण्यासाठी ही विशेष साडी बाजारात आणली असून, 1 हजार रुपयांपासून तिची किंमत सुरू हाेते आहे.’ काेराेना साथीमुळे आता साेशल मीडियाच्या मध्यमातून व्यापार सुरू असल्याचे सांगून डावर म्हणाले, ‘आमच्याकडे या साडीसाठी देशभरातून ऑर्डर येत आहेत.याचा अर्थ देशभरातील महिला कंगनाचे समर्थन करत आहेत.’ दरम्यान, कंगनाने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल काेश्यारी यांची भेट घेऊन तिला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. काेश्यारी यांनी कंगनाचे म्हणणे ऐकून घेतले आहे.