‘ओटीटी कंटेंट’च्या मर्यादा निश्चित करण्याची गरज

    16-Sep-2020
Total Views |
पूर्वी घरात रेडिओ हे एकमेव करमणुकीचे साधन हाेते. नंतर टीव्ही आला. ‘व्हिसीआर’ने एक काळ गाजवला. आता विविध वाहिन्या 24 तास तुमच्या मनाेरंजनासाठी सिद्ध असताना त्यात भर पडली आहे ती ‘ओव्हर द टाॅप’ (ओटीटी) या तंत्रज्ञानाची. काेणतेही बंधन नसल्यामुळे घरबसल्या किती करमणूक करून घ्यावी याला मर्यादा नाहीत. ‘ओटीटी’चा मुख्य ग्राहक आहे ताे युवावर्ग. त्याच्या अतिरेकामुळे युवकांमध्ये मानसिक समस्या वाढत असल्याचे दिसू लागल्यामुळे भारतात ‘ओटीटी कंटेंट’च्या मर्यादा निश्चित करण्याची मागणी हाेऊ लागली आहे.
 

srtjytj_1  H x
 
संध्यानंद.काॅम 
प्रत्येकाचे महत्त्व त्या काळात असते. भारतात प्रारंभीच्या काळात दूरदर्शनची एकच वाहिनी हाेती आणि करमणुकीसाठी ती पुरेशी ठरत हाेती. बातम्या, काही मालिका आणि काही कार्यक्रमांवर लाेक खूश असत. पण, नंतर वाहिन्या येऊ लागल्या आणि करमणुकीचे जग विस्तारत गेले. या वाहिन्यांवर 24 तास अखंड कार्यक्रम सुरू असतात. तुम्ही केव्हाही ते पाहू शकता. मालिकांना तर जणू अंतच नाही. टीव्हीआधी चित्रपट हे करमणुकीचे मुख्य माध्यम हाेते. पण, त्याचा प्रवासही साेपा नव्हता, आजही नाही. चित्रपट तयार झाल्यावर ताे चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे (फिल्म सेन्सर बाेर्ड) पाठवावा लागताे आणि त्यांच्या मापदंडांमध्ये बसणारा चित्रपट प्रदर्शनासाठी माेकळा हाेताे. चित्रपट झळकण्यापूर्वी काही वेळा त्यात काटछाट झालेली असते. चित्रपट पाहावयाचा म्हणजे चित्रपटगृहापर्यंत जाणे आलेच; पण आता हे हळूहळू कमी हाेत चालले आहे. तुम्ही केव्हाही, काेठेही करमणूक करून घेऊ शकता. ‘सेक्रेड गेम्स’, ‘मिर्जापूर’, ‘पाताललाेक’सारख्या वेबसीरिज तुम्हाला हव्या तेव्हा माेबाइल, टॅब्लेट किंवा काॅम्प्युटरवर उपलब्ध आहेत. काेणत्याही काटछाटीविना त्या पाहता येतात. हा सगळा कंटेेंट येताे ‘ओटीटी’ प्लॅटफाॅर्मवरून.करमणुकीबराेबर काही प्रमाणात अश्लीलताही घराेघरी दाखल हाेऊ लागली असून, त्याला बळी पडते आहे ती तरुण पिढी. सामाजिक, धार्मिक आणि नैतिकतेला धक्का देण्याचा आराेप गेल्या काही दिवसांत काही मालिकांवर झाला आहे.