एका नव्या अध्ययनानुसार, आळशी व्यक्ती जास्त काळ चिंतन करत असतात. ते सक्रिय राहणाऱ्यांच्या तुलनेत जास्त बुद्धिमान असू शकतात. संशाेधकांच्या मते, सक्रिय लाेकांना आपला मेंदू नेहमी तल्लख ठेवण्यासाठी जास्त सक्रिय राहण्याची गरज असते. अशी माणसे बाेअर हाेऊ नयेत म्हणून शारीरिकरीत्या जास्त सक्रिय राहात असतात. हाय आय्नयू असणाऱ्या लाेकांना लवकर उबग येत नसताे. त्यामुळे ते जास्त काळ चिंतन करू शकतात.