पैठण, 15 सप्टेंबर (आ.प्र.) : : जायकवाडी धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने धरणातून रात्री 37728 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला.रात्री 8च्या सुमारास धरणाचे 18 दरवाजे दाेन फुटांनी वर उचलण्यात आले. यात धरणाखालील पूल पाण्याखाली गेला असून, दक्षिण जायकवाडीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान, गाेदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण काठाेकाठ भरत आले असतानाच पाण्याची आवाक वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा 98.40 टक्के इतका कमी करण्यात येईल, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. जायकवाडी धरणाकडे जाणारे सर्व रस्ते पाेलिसांनी बंद केले असून, पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला आहे. धरण परिसरात पायी जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.