पूर्ण हाेत आलेल्या व प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांची माहिती द्यावी

16 Sep 2020 10:53:05
राज्यपाल काेश्यारी यांची सूचना : डाॅ. शिंगणे, पाटील यांच्याशी केली चर्चा

strhdyj_1  H x  
 
मुंबई, 15 सप्टेंबर (आ.प्र.) : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधीव्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा, या मागणीवर राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यातील पाच हजार काेटी रुपयांवरील जे प्रकल्प पूर्णत्वाकडे पाेहाेचले आहेत, त्याचबराेबर पर्यावरण परवानगी किंवा इतर काही कारणांसाठी प्रलंबित आहेत, अशा प्रकल्पांची माहिती सादर करावी, असे निर्देशही राज्यपालांनी दिले आहेत.
बुलडाण्याचे पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजभवनात बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लाेकेश चंद्र, सिंदखेडराजाचे आमदार राजेश एकडे उपस्थित हाेते.राज्यातील जलसंपदा प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी काही प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घाेषित करता येऊ शकतील का, याचीही शक्यता तपासण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या.डाॅ. शिंगणे यांनी राज्यपालांना जिजाऊंचे तैलचित्र यावेळी भेट दिले, तसेच जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील किल्ल्याला भेट देण्याचे निमंत्रण राज्यपालांना दिले. राज्यपालांनी हे निमंत्रण सहर्ष स्वीकारले.
 
Powered By Sangraha 9.0