स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचे माेठे शहर ्नलेसियामध्ये सिटी ऑफ आर्ट्स अॅन्ड सायन्स काॅम्प्ले्क्स आहे. क्लेसिया शहराची स्थापना इ.स. 132 मध्ये राेमन सत्ताधाऱ्यांनी केली. या शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा तर आहेच, पण कलेसाठीही ते प्रसिद्ध आहे. येथील तुरीया नदीच्या किनारी दाेन कि.मी.च्या परिसरात अनाेख्या आकारांच्या इमारती पाहावयास मिळतात. यातील काही इमारती वैज्ञानिक कारणांसाठी, तर काही कलाकाैशल्यासाठी प्रसिद्ध आहेत.