घरातील पुस्तकांची आकर्षक लायब्ररी कशी असावी?

    16-Sep-2020
Total Views |
अनेक जण घरी पुस्तकांची लायब्ररी तयार करतात, छान बाल्कनीत झाेपाळ्यावर किंवा खुर्चीत बसून हातात काॅफीचा कप घेऊन हवं तेव्हा, हवं ते पुस्तक वाचता येतं.

fhdtyjk_1  H x  
 
परंतु हवं तेव्हा हवं ते पुस्तक वेळेवर सापडतच असं नाही, मग शाेधाशाेध करावी लागते. असं हाेऊ नये म्हणून घरात पुस्तकांची लायब्ररी तयार करताना काय करता येईल ते जाणून घेऊ या.पुस्तकांच्या विषयांचे गट पाडा आणि प्रत्येक पुस्तकांना नंबर देऊन त्या विषयाप्रमाणे पुस्तके कपाटात ठेवा.पुस्तकांची अशी मांडणी केली, तर पुस्तकांची शाेधाशाेध करावी लागत नाही.लेखकाच्या नावाप्रमाणेही तुम्ही पुस्तकांचे गट पाडू शकता. अनेकदा पुस्तकं वेगवेगळ्या रंगांची आणि आकाराची पुस्तकं असतात, अशा पुस्तकांना तुम्ही सारख्या रंगांचे कव्हर लावू शकता. त्यामुळे पुस्तकही खराब हाेणार नाही व कपाटही चांगलं दिसेल. लहान मुलांच्या पुस्तकांचा कप्पा रंगीत आणि आकर्षक करावा, म्हणजे मुलांना पुस्तकं वाचण्यात रुची निर्माण हाेईल.पुस्तकांवर धूळ बसू नये म्हणून पुस्तकांच्या कपाटाला काच लावून घ्या.या मुळे पुस्तकांवर धूळ बसणार नाही व पुस्तकं व्यवस्थित राहतील.पुस्तकं उभी ठेवली तर कमी जागा व्यापली जाते. काही जाड पुस्तकं आडवी ठेवावीत. पुस्तकांना वाळवी किंवा कीड लागू नये म्हणून यासाठी पुस्तकांच्या मागे डांबराच्या गाेळ्या ठेवू शकता. याशिवाय पेस्ट कंट्राेल करू शकता. कडूलिंबाची पाने मलमलच्या कपड्यात बांधून ती पुस्तकाच्या कपाटात ठेवू शकता.पंधरा दिवसांतून किमान महिन्यातून एकदा तरी पुस्तकांना ऊन दाखवा.तसेच पुस्तकं ठेवताना ती एकमेकांना घट्ट चिकटवून ठेवू नका, त्यामुळे ती खराब हाेतात.किंचितशी पट्टी जाईल इतकी जागा तरी पुस्तकांच्या मध्ये असणे आवश्यक आहे. कारण पुस्तकांना थाेडी हवा लागणं आवश्यक आहे. ज्यामुळे पुस्तकांना काेंदट वास येणार नाही.
एखादं पुस्तक जास्त दिवस वापरलं गेलं नसेल तर, ते मधून मधून चाळावं.कारण जास्त काळ तशीच राहिली तर ती एकमेकांना चिकटतात. आणि पिवळीही पडतात.