साेलापूरसाठी हातमाग उपकेंद्राचा प्रस्ताव द्या : गडकरी

    16-Sep-2020
Total Views |
साेलापूर, 15 सप्टेंबर (आ.प्र.) : साेलापूरला डाळिंब, ऊस, बाेर यासारख्या पिकांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्याेगनिर्मिती शक्य आहे. हातमाग व यंत्रमागाच्या विकासासाठीही साेलापूर विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. यासाठी विद्यापीठात हातमाग व यंत्रमाग उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिल्यास त्यास मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीμ. पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत सूक्ष्म, लघू, मध्यम उद्याेग, उद्यमशीलता आणि विद्यापीठांची भूमिका या विषयावरील ऑनलाइन चर्चासत्रात गडकरी यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती, राज्यपाल भगतसिंह काेश्यारी हाेते. प्रास्ताविकात कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाकडून उद्याेगवाढीसंदर्भात करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्याेगांच्या माध्यमातून समाजाचा व देशाचा चाैफेर विकास हाेताे. उत्पादन वाढवून आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी याेगदान द्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.