‘जनरेशन एन’ने उभे केले जगभरातील कंपन्यांपुढे आव्हान

    16-Sep-2020
Total Views |
काेराेना महामारीमुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे ग्राहकांचा ‘जनरेशन एन’ (नाेव्हेल) हा नवा वर्ग उदयाला आला असून, त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपन्यांना धाेरणे बदलावी लागली आहेत.इंटरनेट, साेशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफाॅर्मबराेबर प्रथमच जाेडला गेलेला हा वर्ग आहे.

aehsrth_1  H x  
 
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर (वि.प्र.) : महामारीमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल हाेत असले, तरी या साथीमुळे ग्राहक आणि बाजारपेठेत बरेच बदल झाले आहेत आणि त्यातून ‘जनरेशन एन’चा उदय झाल्याचे ‘मॅकेन्झी’ या कंपनीच्या एका सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गामुळे कंपन्यांना त्यांच्या धाेरणांबराेबरच वस्तूंचे पॅकिंग आणि त्यांच्या मार्केटिंगमध्येही बदल करावे लागल्याचेही दिसले आहे.
 
‘जनरेशन एन’ म्हणजे काय? : इंटरनेट, साेशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफाॅर्मबराेबर प्रथमच जाेडला गेलेला ग्राहकांचा वर्ग म्हणजे ‘जनरेशन एन.’ काेराेना महामारीमुळे या ग्राहकांची पहिली पसंती ऑनलाइन खरेदीला आहे. साथीपूर्वी हा वर्ग डिजिटल जगाबराेबर फार संबंधित नव्हता. ‘जनरेशन सी’ किंवा ‘जनरेशन कनेक्ट’पेक्षा हा वर्ग पुढे आहे. गरजेनुसार डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करून घेऊन जास्तीत जास्त कामे त्याद्वारे करणाऱ्या पिढीला ‘जनरेशन सी’ असे म्हणतात.
 
फक्त तीन महिन्यांत : ‘जनरेशन एन’ वर्गामुळे अमेरिकेच्या ई-काॅमर्स बाजारपेठेत नव्वद दिवसांत (तीन महिने) नऊ वर्षांत हाेणारे बदल झाले आहेत. 2009 मध्ये त्या देशात ई-काॅमर्सची पाेहाेच पाच टक्के वर्गापर्यंत हाेती. 2019मध्ये ती 16 ट्न्नयांवर गेली आणि या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत हे प्रमाण 88 टक्क्यांपर्यंत पाेहाेचल्याचे ‘मॅकेन्झी’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.मानसिकतेत बदल : पूर्वी दुकानांमध्ये जाऊन खरेदी करणारे ग्राहक आता तिकडे जाण्यास तयार नाहीत. महामारी सुरू झाल्यापासून केवळ 66 दिवसांत ग्राहकांच्या मानसिकतेत हा बदल झाला आहे. ग्राहक आता ऑनलाइन खरेदीच करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 
ग्रामीण भागही डिजिटल : या सर्वेक्षणातून सामाेरे आलेले एक महत्त्वाचे तथ्य म्हणजे, जगातील केवळ माेठ्या शहरांमध्येच नाही, तर भारतातील छाेट्या गावांमध्येही ‘जनरेशन एन’चा नवा ग्राहक वर्ग तयार झाला आहे. खरेदीपासून त्याचे पैसे चुकते करण्यापर्यंत ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार वाढले आहेत.