टेरेसवर 2500 कॅक्ट्सची लागवड

    16-Sep-2020
Total Views |

eahsj_1  H x W:
 
काेझिकाेड, 15 सप्टेंबर (वि.प्र.) : इ. बालकृष्णन दक्षिण भारतात केरळ या राज्यातील हे एक ज्येष्ठ गृहस्थ. त्यांचा व्यवसाय आहे प्रिंटिंगचा. मात्र त्यांना कॅक्ट्स जमवण्याचा छंद असून, घरातील गच्चीवरील बागेत त्यांनी 200 प्रजातींचे अडीच हजार कॅक्ट्स जमवले आहेत. त्यातील काही कॅक्ट्स परदेशातून आयात केलेले आहेत.हे रंगीबेरंगी कॅक्ट्स पाहून अनेकांना समाधान वाटले आहे.
ब्राझील, थायलँड, जपान, इंडाेनेशिया अशा विविध देशांतून त्यांनी ई बेच्या माध्यमातून हे कॅक्ट्स जमवले आहेत. आजूबाजूच्या बागांतून काही लाेक त्यांना कॅक्ट्सची राेपे भेट देतात, तसेच ते स्वतः ग्राफ्टिंग करून नवी राेपे तयार करतात. पत्नी देवी, तसेच राहुल आणि गाेकुळ ही मुले त्यांना या कामात मदत करतात.