उत्तराखंडमध्ये सापडले 1 काेटी वर्षांपूर्वीच्या माकडाचे अवशेष

    16-Sep-2020
Total Views |
 
sru6u_1  H x W:
 
डेहराडून, 15 सप्टेंबर (वि.प्र.) : आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांना उत्तराखंड राज्यात सुमारे 1 काेटी 3 लाख वर्षांपूर्वीच्या माकडाचे अवशेष सापडले आहेत. यामुळे आता आफ्रिकेतून माकडे आशियात केव्हा आली याची माहिती मिळू शकेल. हे 1 काेटी 3 लाख वर्षांपूर्वीचे माकड आजच्या माकडाचे पूर्वज असल्याचा प्राणिशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.या माकडाच्या अवशेषांची सविस्तर माहिती ‘प्राेसिडिंग्ज ऑफ राॅयल साेसायटी, ‘बी’मध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार या प्राचीन माकडांचे हात खूप लांब हाेते. वर्षापूर्वी रामनगर येथील प्रख्यात फोशिल साइटवर भारताची पंजाब युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेच्या अ‍ॅरिझाेना युनिव्हर्सिटीच्या प्राणिशास्त्रज्ञांना प्राचीन काळातील माकडाचा दात सापडला व त्यानंतर आणखी काही अंतर चालल्यानंतर माकडाच्या हाडांचा सापळा सापडला हाेता.
आता सापडलेल्या माकडांच्या अवशेषाबाबत न्यूयाॅर्क युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ ख्रिस्टाेफर गिल्बर्ट यांनी सांगितले की, हाडांचा आकार पाहून हे लांब हाडाचे माकड आजच्या माकडाचे पूर्वज असावेत. या माकडांचे अस्तित्व आि्रकेतच हाेते. माकड आणि माणसांमध्ये बरेच साम्य असल्यामुळे माकडांना माणसाचे पूर्वज मानले जाते व ही माकडे आि्रकेतूनच आशियात आल्याचे मानण्यात येत हाेते. आता या प्राचीन माकडाच्या अवशेषांवरून माकडे आि्रकेतून आशियात केव्हा आली, याचा कालावधी कळणार आहे.