...आणि अमेरिकेतील पाेलिस अधिकाऱ्याने गवत कापले

16 Sep 2020 11:39:39
 

zdfhsghdy_1  H
 
वाॅशिंग्टन, 15 सप्टेंबर (वि.प्र.) : अमेरिकेतील मिनिसाेटा येथे ड्युटीवर असलेल्या वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याने एका वृद्ध महिलेच्या लाॅनमधील गवत मशीनद्वारे कापले.यामागे वृद्ध महिलेला मदत करणे हाच हेतु हाेता. काही लाेकांनी याबद्दल पाेलीस अधिकाऱ्याची थट्टा केली; पण ज्यावेळी ही घटना साेशल मीडियावर प्रसारित झाली. त्यावेळी जगभरातील लाेकांनी या पाेलीस अधिकाऱ्याची खूप प्रशंसा केली.काही लाेकांनी आपणसुद्धा वृद्ध हाेणारच! त्यावेळी काेणीतरी आपल्याला मदत करावी, अशी आपली अपेक्षा असणार. त्यामुळे आपण तरुण वयातच वृद्धांना मदत करण्याची या पाेलीस अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घ्यावी, अशी जगभरातील असंख्य लाेकांनी प्रतिक्रिया व्य्नत केली आहे. या पाेलीस अधिकाऱ्याचे नाव मॅट सिल्टला आहे.ते काॅल अधिकारी पदावर ओराेनाे पाेलीस स्टेशनमध्ये सध्या ड्युटीवर असतात.ड्युटीवर असताना त्यांना एका वृद्ध महिलेचा फाेन आला व ते लगेच त्या वृद्ध महिलेच्या घरी गेले व ती आजारी नाही ना? याची चाैकशी केली. या वृद्ध महिलेची तब्येत चांगली असल्याचे समजल्यावर ते परत जायला निघाले असता त्यांची नजर घरासमाेरच्या लाॅनकडे गेली.लाॅनमध्ये गवत वाढलेले असल्याचे पाहून त्यांनी लगेच गवत कापण्याच्या यंत्राने लाॅनमधील गवत कापले व गवताचा ढीग कचरा कुंडीतही नेऊन टाकला. त्यांचे हे काम न्नकीच प्रशंसनीय आहे.
 
Powered By Sangraha 9.0