प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम

    15-Sep-2020
Total Views |
 
adhtjry_1  H x
 
पुणे, 14 सप्टेंबर (आ.प्र.): पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे तीन वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम (खउ उ) प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.विद्यापीठात गेल्या वर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.त्यासाठी हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत चालवला जाताे.या अभ्यासक्रमाची 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दाेन्ही पद्धतीने पार पडणार आहे.शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर त्यांना प्रवेश दिला जाईल.यामध्ये 80 टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाइन माध्यमातून आणि उर्वरित 20 टक्के ऑफलाइनच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे. या अभ्यासक्रमात केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन पातळ्यांवर तयारी करून घेण्यात येईल. या अभ्यासक्रमाद्वारे लेखन सराव, व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी भाषेवर प्रावीण्य मिळवण्याकरिता कार्यक्रम, वादविवाद कार्यक्रम, चर्चासत्र, वेबिनार या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे.SPPU मूडल लर्निंग अ‍ॅप्लिकेशन, लाईव्ह लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी विशेष सत्र, ऑनलाइन पद्धतीने लेखनाचा सराव व त्याचे मूल्यमापन ऑनलाइन प्रश्नाेत्तरे, परीक्षा व मूल्यमापन, विद्यापीठातील प्राध्यापक आणि तज्ज्ञ मंडळींकडून शिकण्याची संधी डिजिटल लायब्ररी डिजिटल या सुविधा आहेत.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, त्यासाठी लिंक https:// campus.unipune.ac.in/CCEP/अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या 020-25621841/42 या क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा लशर्लीपर्ळिीपश.रल.ळप या ई मेलद्वारे संपर्क साधू शकता. तसेच डाॅ. सी. आर. दास, 9271247466. प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधावा.