...नाहीतर मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील

    15-Sep-2020
Total Views |
संभाजी ब्रिगेडचा आरक्षणप्रश्नी सरकारला इशारा

etsjyku_1  H x  
 
पुणे, 14 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क,पुणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने न्यायालयात बाजू मांडण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याने, मराठा समाज आरक्षणाचा बळी ठरला आहे, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेड संघटनेचे विकास पासलकर यांनी केंद्र, राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असे त्यांनी सांगितले.या वेळी विकास पासलकर म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी कित्येक वर्षापासून लढा दिला जात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर शांततेच्या मार्गाने माेर्चे काढले. त्याचदरम्यान 50 जणांनी बलिदान दिले. तरीदेखील राज्य आणि केंद्र सरकारला जाग आली नाही.आरक्षण मिळेल असे वाटत असताना, न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडले की मुद्दाम बाजू मांडली गेली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे राज्य सरकारने येत्या तीन-चार दिवसांत पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि चांगली बाजू मांडावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, आजवर ज्या पक्षांनी सत्ता भाेगली तेदेखील मराठा समाजाच्या दृष्टीने निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहेत.त्या सर्व राजकीय पक्षांचा आम्ही निषेध व्यक्त करताे.देशात कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला तिहेरी तलाक, जम्मू काश्मीर येथील कलम 370 आणि राममंदिर प्रश्न मार्गी लागू शकताे. मग मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लागू शकत नाही? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.निवडणुका आल्या, की प्रत्येक पक्ष म्हणताे, तुमचा प्रश्न मार्गी लावू, पण पुढे काही हाेत नाही. आजवर सर्व पक्षांना समजून घेतले. मात्र आता सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील या वेळी देण्यात आला.