
भाजी चिरताना किंवा काही कापताना आपलं बाेट चाकूने कापलं जातं. मग भळाभळा रक्त वाहायला लागतं. रक्त थांबवण्यासाठी बाेट पाण्याखाली धरलं किंवा हळद-चहा पावडर लावली जाते, त्यामुळे र्नत येणं थांबतं. पण यामुळे र्नत थाबंत कसं, हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या र्नतात लाल रक्तकण, पांढरे र्नतकण, प्लाझ्मा आणि प्लेटलेट या घटकांचा समावेश असताे. कापलेल्या ठिकाणाहून बाहेर येणाऱ्या रक्तप्रवाहाला थाेपवण्याचं काम र्नतातील प्लेटलेट करतात. ही क्रिया कशी हाेते, ते समजून घेऊ या. ज्या ठिकाणी लागलेलं असतं.त्या जखमेच्या चारही बाजूंनी हे प्लेटलेट जमा हाेतात. आणि प्लाझ्मापासून काही पदार्थांना साेबत घेऊन थ्राेम्बाेप्लास्टिन नावाचा पदार्थ तयार केला जाताे. हा पदार्थ प्लाझ्मात असलेल्या फ्रायब्राेनिजीन नावाच्या प्राेटीनला फाइब्रिनमध्ये रूपांतरित करताे. फाइब्रिनच्या बारीक रेषा जखमेच्या चारही बाजूंना जमा हाेऊन एक जाळं तयार हाेतं. हे जाळं र्नत बाहेर येऊ देत नाही.त्यामुळे जखमेतून येणारं रक्त थांबतं. तसेच प्लेटलेटचा एक प्रकार हार्माेन्सचीही निर्मिती करताे. यालाच सेराेटाेनीन असं म्हणतात.या हार्माेनमुळे देखील र्नतवाहिन्या आकुंचन पावतात आणि यामुळेही र्नत जखमेतून बाहेर येत नाही.