इटलीमधून जाणाऱ्या प्रत्येकाची काेविड चाचणी हाेणार

    15-Sep-2020
Total Views |
काेविड-19 चा युराेपातील उद्रेक पाहता येथे अनेक आठवडे पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली हाेती. मात्र, आता हळूहळू पर्यटनाला सुरुवात हाेत आहे. इटलीतून पुन्हा मायदेशी परतताना काेविडची चाचणी करण्यात येणार असून, जर लागण झाल्याचे लक्षात आले, तर काही दिवस तेथेच राहावे लागणार आहे.

fdz_1  H x W: 0 
 
इटलीमध्ये पर्यटनाला सुरुवात झाली असली, तरी काेविड-19 चा उद्रेक पाहता सर्व काळजी घेण्यात येत आहे. नव्या नियमानुसार इटलीमध्ये आल्यावर साथराेगाची बाधा झाली, तर संबंधिताला इटलीतच क्वारंटाइन करण्यात येईल. राेममधून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी घेण्यात येणार असल्याची घाेषणा सरकारने केली आहे.काेविड-19 चा युराेपातील उद्रेक पाहता येथे अनेक आठवडे पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली हाेती. मात्र, आता हळूहळू पर्यटनाला सुरुवात हाेत आहे. मात्र, इटलीतून पुन्हा मायदेशी परतताना काेविडची चाचणी करण्यात येणार असून, जर लागण झाल्याचे लक्षात आले, तर काही दिवस तेथेच राहावे लागणार आहे. जेव्हा चाचणी निगेटिव्ह येईल, तेव्हाच मायदेशी परतण्याची परवानगी मिळेल.राेम विमानतळावरून परत जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करण्याची इटलीच्या आराेग्य मंत्रालयाची याेजना आहे. याचे कारण म्हणजे काही वैमानिकांना काेराेनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे; तसेच ज्या देशांमध्ये संसर्ग अधिक झाला आहे, त्या देशांमधून आलेल्या 25 हजार प्रवाशांचीही चाचणी घेण्यात आली आहे. स्पेन, माल्टा, ग्रीस आणि क्राेएशिया या देशांमधून आलेल्या प्रवाशांची ऑगस्टच्या मध्यापासून चाचणी घेणे सुरू करण्यात आले आहे. कारण या देशांमधून आलेल्या इटलीच्या नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे देशातील बाधितांच्या संख्येतही वाढ झाली आहे.