सगळीकडे आढळून येणारी बाभळी ही एक काटेरी वनस्पती आहे. तिची झुडपे आणि छाेट्या उंचीचे झाड असे दाेन प्रकार आढळून येतात. बाभूळ हे झाड शेतकरी व शेतीसाठी अत्यंत उपयाेगी आहे. बाभळीचे लाकूड कठीण असते.बाभळीच्या खाेडाला छेद केल्यास त्यातून डिंक स्रवताे. हा उत्तम प्रकारचा डिंक पाैष्टिक असल्याने त्याचा कूट करून त्यापासून बनवलेले लाडू बाळंतिणीला खायला घालतात. ताे वृक्ष नसताे तेव्हा त्याला वेडी बाभळ म्हणतात. घरांनाशेतांना वेड्या बाभळीच्या काटेरी झुडपांचे कुंपण घालतात. बाभूळ ही भारतातील सर्वांत महत्त्वाच्या व उपयुक्त वनस्पतींपैकी एक आहे. तिचे अनेक उपयाेग आहेत. या वृक्षाचे लाकूड खूप कठीण आणि टिकाऊ असते. त्यापासून अवजारांच्या मुठी व नावेच्या वल्ही तयार करतात.जळाऊ लाकूड म्हणून ते उपयुक्त असते. सालीचा आणि शेंगांचा उपयाेग कातडी कमाविण्यासाठी, काळा रंग आणि शाई बनविण्यासाठी हाेताे. बाभळीचा डिंक चिकटगाेंद म्हणून वापरला जाताे. ताे पाैष्टिक असून, डिंकाचे लाडू करण्यासाठीही वापरला जाताे. साल, पाने, फुले, शेंगा आणि खाेड यांपासून मिळणारे डिंक औषधी आहेत.भारतात आणि आफ्रिकेच्या दक्षिण भागात बाभळीच्या काेवळ्या फांद्या दात घासायला वापरतात; त्यामुळे हिरड्या आणि दात बळकट हाेतात. काेवळा पाला व शेंगा शेळ्यामेंढ्यांना चारा म्हणून देतात.बाभळीच्या काेवळ्या फांद्यांचा (काड्यांचा) उपयाेग दात घासण्यासाठी करतात. या वृक्षास श्रावण महिन्यात सुंदर पिवळी फुले येतात. याचा पाला बकऱ्यांचे व मेंढ्यांचे एक आवडते खाद्य आहे.