सरकारकडून अन्याय हाेत असल्याच्या निषेधार्थ ‘आयएमए’चा हल्लाबाेल

    14-Sep-2020
Total Views |

rehstrh_1  H x  
 
पुणे, 13 सप्टेंबर (आ.प्र.) : काेराेनाकाळातही राज्य सरकार डाॅक्टरांशी अत्यंत आक्षेपार्ह आणि अन्याय्य पद्धतीने वागत असल्याचा निषेध करत इंडियन मेडिकल असाेसिएशनच्या (आयएमए) राज्यभरातील डाॅक्टरांनी निदर्शने केली. खासगी रुग्णालयांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. 11) राज्यभरातील 216 आयएमए शाखांत शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच डाॅक्टरांनी त्यांच्या रजिस्ट्रेशनची आणि सरकारच्या आदेशाची प्रतीकात्मक हाेळी केली.आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भाेंडवे यांच्यासह महाराष्ट्र राज्य कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. सुहास पिंगळे आणि उपाध्यक्ष डाॅ. राजेंद्र कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.जवळपास सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील डाॅक्टर हे अथक परिश्रम घेत आहेत. सरकारी यंत्रणेला मदत म्हणून खासगी डाॅक्टरांनी माेफत वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारीसुद्धा पेलली आहे.त्याशिवाय अनेक खासगी रुग्णालये काेविड रुग्णांना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. मात्र, तरीही सरकार हस्तक्षेप करून व्यावसायिक स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.एकतर्फी दर नियंत्रित करणे, काेविड व्यतिरिक्त इतर आजारांच्या उपचारदरात सरकारी हस्तक्षेप, काेविडवरील उपचाराचे न परवडणारे दर. याला आयएमएचा विराेध आहे. सरकारच्या अशा निर्णयांमुळे असंख्य छाेटी आणि मध्यम स्वरूपाची रुग्णालये बंद पडतील, असा इशारा आयएमएने दिला आहे.