‘लाेकराज्य’चा ‘ऑनलाइन शिक्षणप्रशिक्षण’ आढावा विशेषांक प्रकाशित

    14-Sep-2020
Total Views |
 
xfgnfj_1  H x W
 
मुंबई, 13 सप्टेंबर (आ.प्र.) : राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्ते प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लाेकराज्य’ मासिकाचा सप्टेंबरचा ‘ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण’ विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकात ऑनलाइन शिक्षण व प्रशिक्षणासंदर्भातील शासनाचे धाेरण, त्याची अंमलबजावणी, तसेच काैशल्य शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आदी क्षेत्रांतील काेराेनाच्या पार्श्वभूमीवरील शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.त्याचबराेबर शालेय शिक्षण, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, आदिवासी विकास, इतर मागास बहुजन कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती याेजनांची माहिती, वन, गृहनिर्माण, आराेग्य आदीं विषयीची माहिती, महत्त्वाच्या घडामाेडी व मंत्रिमंडळाचे निर्णय आदी माहितीचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.