सावधानता बाळगत काेराेनाला हरवूया : राज्यपालांचे प्रतिपादन

    14-Sep-2020
Total Views |
वर्षपूर्तीनिमित्त ‘जनराज्यपाल : भगत सिंह काेश्यारी’ या सचित्र पुस्तकाचे व ई-बुकचे प्रकाशन

xfncgm_1  H x W 
 
मुंबई, 13 सप्टेंबर (आ.प्र.) : काेराेनाच्या भीतीमुळे घाबरून न जाता निर्भीड बना. सावधानता बाळगून काेराेनाला हरवूया, असा सल्ला राज्यपाल भगत सिंह काेश्यारी यांनी येथे दिला.‘जनराज्यपाल : भगत सिंह काेश्यारी’ या सचित्र पुस्तकाचे आणि ई बुकचे प्रकाशन राजभवनात झालेल्या छाेटेखानी साेहळ्यात राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संताेष कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डाॅ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित हाेते.राज्यपालपदी नियुक्ती हाेऊन 5 सप्टेंबरला एक वर्ष झाले त्यानिमित्त वर्षभरातील कार्याचा सचित्र अहवाल या पुस्तकरूपाने मांडण्यात आला आहे.गेल्या वर्षभरात राज्यातील सुमारे 20 जिल्ह्यांचा दाैरा केला. राज्यातील दुर्गम भाग असलेला गडचिराेली, नंदुरबार, पालघर या भागाचा दाैरा केला. नंदुरबार जिल्ह्यातील माेलगी या गावात मुक्काम केल्याचा अनुभवही राज्यपालांनी यावेळी सांगितला. काेराेना काळातही दाैरे केल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभराच्या काळात 250 शिष्टमंडळांनी भेट घेतल्याचे सांगताना राज्यपाल म्हणाले, की प्रत्येक दिवस हा कामाचा असताे. त्यामुळे सुटीच्या दिवशीही काम करण्याचा माझा प्रयत्न असताे. 50 मिनिटांत शिवनेरी पायी चढून गेल्याचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला.वर्षपूर्तीनिमित्तच हे ई-बुक राजभवनच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार आहे.त्यात क्यूआरकाेड आणि ई-लिंकचाही वापर करण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी प्रास्ताविक केले.