पुणे, 13 सप्टेंबर (आ.प्र.) प्री-फॅब्रिकेटेड माॅड्यूलर किचन क्षेत्रातील उद्याेजक आणि आदित्य किचन्सचे भागीदार शशिकांत शिवाजीराव देवदास यांचे नुकतेच निधन झाले. ते 53 वर्षांचे हाेते.त्यांच्यामागे आई शालिनी, पत्नी वंदना, मुलगा अभिषेक, मुलगी स्नेहा, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ‘आदित्य किचन्स’च्या देशभरात 25 फ्रँचाइझीचे जाळे उभारण्यात देवदास यांचे माेलाचे याेगदान हाेते. ‘टेलरमेड किचन’चे उत्पादन करून दिल्ली ते त्रिवेंद्रमपर्यंत ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरवली.