याेग्य आणि संतुलित आहार ठेवताे तुम्हाला निराेगी

    14-Sep-2020
Total Views |
आहाराचा आराेग्याबराेबर फार जवळचा संबंध असताे. पण काेणता आहार काेणाला याेग्य, याचा काही ठाम निकष नाही आणि काेणती आहारपद्धती सर्वांत याेग्य हेही नक्की नाही. पुरेशी पाेषणमूल्ये असलेला आहार आराेग्यासाठी याेग्य असल्याचे सांगता येते.
 
asrgra_1  H x W
 
आपले शरीर विविध प्रकारे आपल्याला आहाराबाबत सांगत असते. तुमचा आहार याेग्य नसेल, तर त्यातून काही त्रास सुरू हाेतात. म्हणजे शरीर आपल्याला आहार बदलण्यास सांगत असते. आपल्या आहाराच्या सवयी काय आहेत आणि कशा बदलाव्यात ते पाहा. खालील सवयी तुम्हाला असतील, त्रास हाेत असेल, तर आहारपद्धत बदलायला हवी आहे हे लक्षात ठेवा...
 
सारखे स्नॅक्स खावेसे वाटणे : भाेजनादरम्यानच्या काळात तुम्हाला सारखे स्नॅक्स खावेसे वाटत असेल आणि त्या वेळी तुम्ही चिप्स किंवा कुकीजचा एक पूर्ण पुडा फस्त करत असाल, तर थांबा आणि विचार करा. तुमच्या आहारात काही तरी कमतरता असल्याचे हे लक्षण आहे. असे वारंवार खावेसे वाटण्याने अनेकांच्या मनात अपराधीपणाची भावनाही निर्माण हाेते. स्वत:वर संयम ठेवता येत नसल्याने असे खाल्ले जात असल्याचे त्यांना वाटते. स्नॅक्समधील अनेक पदार्थ आराेग्याच्यादृष्टीने याेग्य नसतात. पण ते खावेसे वाटणे याचाच अर्थ तुम्हाला पाेषणमूल्ये कमी पडत आहेत. वारंवार स्नॅक्स खाण्याची तल्लफ येत असल्याबद्दल स्वत:ला दाेष देण्यापेक्षा जीवनसत्त्वे आणि अन्य घटकांचा समावेश असलेला आहार घ्या.चिप्स किंवा कुकीजऐवजी सुकामेवा, तुमची आवडती फळे किंवा भाज्या यांचा आहारात समावेश करा.
 
चव नसणे किंवा मुखदुर्गंधी : अन्नाची चव समजणे आणि जेवणाचे समाधान वाटण्यात जिभेचा वाटा माेलाचा असताे. पण ताेंडाला दुर्गंधी येणे, दातांच्या समस्या किंवा अन्नाची चव न वाटण्यामागे तुमच्या आहारपद्धतीचा दाेष असताे. दातांपासून बघा.
हिरड्यांमधून रक्त येणे, दात पडणे ही शरीरातील सी जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे आहेत. अन्नाची चव लागत नसेल किंवा ताेंडाला दुर्गंधी येत असणे म्हणजे कर्बाेदके कमी पडत आहेत. श्वासालाही दुर्गंध येत असेल, तर त्याचे कारण कर्बाेदके कमी पडणे हेच आहे. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी शरीर मेदाचे ज्वलन सुरू करून कर्बाेदके मिळविते.यावर अगदी साधा उपाय आहे. ताे म्हणजे आहारात फळांचा भरपूर समावेश करणे.वारंवार आजारी पडणे,
 
फ्लू हाेणे : फ्लूचा एक विशिष्ट माेसम असताे. अशा प्रत्येक माेसमात थंडी वाजून तुम्हाला फ्ल्यू हाेत असेल, तर तुम्हाला सी जीवनसत्त्व कमी पडत असल्याचे स्पष्टपणे समजा. राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यात जीवनसत्त्वांचे काम माेलाचे असल्याने त्यांच्या कमतरतेमुळे राेगप्रतिकारशक्ती कमी हाेऊन व्यक्ती वारंवार आजारी पडते. राेगाला राेखण्यात ‘सायटाेकिन्स’सारखे प्रथीन आणि शरीरातील अँटीबाॅडिज आघाडीवर असतात.पण आहारात प्रथिनांची कमतरता असेल, तर ऊर्जे साठी शरीरातील इम्यून प्राेटिन्स वापरली जातात आणि त्यामुळे राेगप्रतिकारशक्ती घटते. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, तर प्रथिनांचे प्रमाण आहारात वाढवा.