वृषभ

    13-Sep-2020
Total Views |
 
fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात कामांमध्ये प्रयत्न आणि परिश्रमामुळे समाधान राहील. नव्या याेजनांचे सार्थक हाेईल. अपरिचितांवर जास्त विश्वास ठेवू नये. भांडवल गुंतवणूक शक्य आहे.खाण्या-पिण्यात नियमितपणा ठेवावा. आपसातील तणाव व बाेलाचालीमुळे मन जडावलेले राहील. निरनिराळे चांगले-वाईट विचार येतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदारांची बदली हाेण्याची शक्यता जास्त आहे. उच्च अधिकाऱ्यांसाेबत मतभेद राहतील. व्यापारी वर्गासाठी व्यापारात बदल हाेण्याची शक्यता दिसत आहे. जे अद्याप व्यवसायात यश मिळवू शकलेले नाहीत त्यांच्या प्रयत्नांना यश येईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. विनाकारण अनावश्यक वाद घालणे टाळावे. आई-वडिलांसाेबत प्रेमाचे संबंध राहतील.मित्रांसाेबत करमणुकीच्या कार्यक्रमाला जाण्याची श्नयता आहे. नवीन लाेकांशी संबंध जाेडण्यापूर्वी पूर्ण विचार करावा.
 
आराेग्य : हा आठवडा घरच्यांच्या आराेग्याबाबत काही तक्रारी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुमचे स्वत:चे आराेग्य उत्तम राहणार आहे. स्नायूत तणाव हाेण्याची शक्यता आहे. तसेच सांधेदुखीची जास्त चिंता करण्याची गरज नाही कारण काळासाेबत ती बरी हाेईल.
 
शुभदिनांक : 13, 17, 18
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात जाेखीम घेण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे.खाण्या-पिण्यावर ताबा ठेवावा.
 
उपाय : या आठवड्यात सकाळी लवकर उठून स्नानादि करून तांब्याच्या लाेट्यात शुद्ध पाणी घ्यावे.