वृश्चिक

    13-Sep-2020
Total Views |

fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात व्यावहारिक जबाबदारी पार पाडू शकाल. नव्या कार्ययाेजनेवर चर्चा हाेईल. वायफळ खर्चापासून दूर राहावे. प्रवासाची शक्यता आहे. नवी प्राॅपर्टी घेण्याचा विचार करू शकता. दीर्घकाळापासून परीक्षा वा टेस्टच्या रिझल्टची वाट पाहात असाल तर ताे सकारात्मक येईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांनी जास्त श्रम करण्याची आवश्यकता आहे. या आठवड्यात स्पर्धा-परीक्षांमध्ये यश मिळण्याची श्नयता आहे. काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. अनेक दिवसांपासून हाेणाऱ्या त्रासाचे निरसन हाेईल.
 
नातीगाेती : हा आठवडा काैटुंबिक दृष्टीने तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे.तुम्हाला तुमच्या काैटुंबिक सदस्यांकडून भरपूर सहकार्य लाभणार आहे, परंतु लहान भावंडांशी तुमचे मतभेद हाेण्याची श्नयता आहे. माेठ्या भावंडांकडून तुम्हाला साथ मिळणार आहे. मुलांविषयी चिंता राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात लहानसहान गाेष्टीं मनाला लावून घेऊ नयेत. काैटुंबिक समस्यांनी तणाव वाढू शकताे. वाहन चालवताना दक्षता व संयम बाळगावा. मन प्रसन्न ठेवावे. तब्बेत प्रफुल्लित राहील. जर पायांमध्ये सूज वा वेदना असतील तर यूरिक अ‍ॅसिड तपासून घ्यावी. सूर्याेपासना करावी.
 
शुभदिनांक : 13, 14, 19
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात वाहन चालवताना व रस्ता ओलांडताना सावध राहावे.अपघातात मार लागण्याची शक्यता आहे.
 
उपाय : सकाळी घराच्या वायव्य दिशेला पांढऱ्या कपड्यात तांदूळ बांधून लटकून ठेवल्यास मंगलकार्याला वेग येईल व वैवाहिक जीवनातील त्रास दूर हाेतील.