रेल्वे जंक्शन म्हणजे काय?

    13-Sep-2020
Total Views |
 
rtjdtyjk_1  H x
 
मित्र मैत्रिणींनाे, तुम्ही झुकझुक आगगाडीने नक्कीच प्रवास केला असेल. सध्या तुम्हाला कुठे जाता येत नाहीये. पण याआधी रेल्वेने प्रवास करण्याची मजा तुम्ही नक्कीच अनुभवली असणार. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आपण रेल्वे स्थानक किंवा स्टेशनवर जाताे, परंतु तुम्ही अनेकवेळा रेल्वे जंक्शन हा एसएचबीडी ऐकला असेल.रेल्वे स्टेशन आणि रेल्वे जंक्शन यात नेमका काय फरक असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? रेल्वे स्थानक किंवा रेल्वे स्टेशनही रेल्वे वाहतुकीसाठीची एक इमारत असते जेथे प्रवाशांच्या चढण्या-उतरण्याकरिता रेल्वेगाड्या थांबतात. रेल्वे स्थानकांमध्ये माल चढवून-उतरवून घेण्याचीदेखील साेय असते. साधारणपणे रेल्वे स्थानकांमध्ये एक वा अनेक फलाट (प्लॅटफाॅर्म) असतात. ज्यामुळे एका स्थानकावर एकाचवेळी अनेक गाड्या थांबू शकतात. रेल्वे स्टेशनवर तिकीट विक्री, प्रतीक्षा खाेली, उपाहारगृह, स्वच्छतागृह इत्यादी अनेक साेयी असतात.ज्या रेल्वे स्थानकांमध्ये एकापेक्षा अधिक रेल्वेमार्ग येऊन मिळतात त्यांना जंक्शन म्हणतात. उदा भुसावळ जंक्शन.आपल्या भारतात किती रेल्वे जंक्शन आहेत याची नक्की माहिती मिळवा.