तूळ

    13-Sep-2020
Total Views |
 
fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात वेळेवर कामे पार पडल्यामुळे कामकाजाबाबत नवी आशा व नवा उत्साह संचारेल. समस्यांचे निराकरण हाेऊ शकेल. आर्थिक प्रकरणे वेळेवर पार पाडा, पण घाईगडबडीत काेणताही माेठा निर्णय घेऊ नका. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे. मन आनंदी राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा विद्यार्थ्यांनी धैर्याने कष्ट करीत पुढे जाण्याचा आहे. त्यामुळे त्यांना यश नक्की मिळू शकेल. व्यावसायिक कामांमध्ये फायद्याचे याेग आहेत. नाेकरदारांसाठी धावपळीची स्थिती राहणार आहे. अधिकाऱ्यांकडून अनुकूलता लाभेल. ही वेळ प्रगतीची आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांकडून भरपूर सहकार्य मिळणार आहे, पण धाकट्या भावा-बहिणींसाेबत कुरबुरीची स्थिती राहणार आहे.तुम्हाला तुमच्या जाेडीदाराची पूर्ण साथ लाभणार आहे, पण संततीविषयी तुमच्या मनात चिंता राहणार आहे. मित्रांशी व्यवहार उत्तम राहतील.
 
आराेग्य : या आठवड्यात काेणतीही गाेष्ट लहान मानून दुर्लक्षू नये. तसेच जाेखमीची कामे टाळण्याचा प्रयत्न करावा. नकारात्मकतेला मनावर कुरघाेडी करू देऊ नये. उष्णता असल्यास गरम पदार्थ खाणे शरीरात प्रतिकूलता उत्पन्न करू शकते. रक्तदाब, गॅस इ.पैकी तक्रार असू शकते.
 
शुभदिनांक : 13, 14, 16
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात विचारपूर्वक बाेलावे. काेणत्याही मुद्यावर मत देताना उत्तेजित हाेऊ नये. तसेच आळस टाळण्यासाठी सकाळी लवकर उठावे.
 
उपाय : कृष्ण व राम तुळशीचे राेप लावावे. तसेच त्यांना नियमित पाणी द्यावे.अडलेल्या कामात प्रगती हाेईल. मंगलकार्यासाेबत आर्थिक लाभही हाेईल.