सिंह

    13-Sep-2020
Total Views |
 
fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात धर्माविषयी रुची वाढेल. स्पर्धा करणे हानिकारक ठरू शकते.काेणत्याही प्रकरणात स्पष्टपणा राखणे आवश्यक असेल. पदाेन्नती हाेईल.मनाेकामना पूर्ण हाेतील. मित्र व नातलग भेटल्यामुळे प्रसन्नता लाभेल. स्त्रीच्या सहमतीने लाभ हाेईल. सध्याचे क्षेत्र साेडणे हानिकारक ठरेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थ्यांनी कठाेर परिश्रम करण्याची गरज आहे. अन्यथा विपरित परिणामाला सामाेरे जावे लागू शकते. नाेकरदार वर्गासाठी हा आठवडा धावपळीचा असणार आहे. कारभारात उन्नती हाेईल.व्यापारात आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात एखादे नातलग आल्यामुळे तुम्हाला प्रसन्नता लाभेल. तुमच्या दांपत्य जीवनात सुख व प्रेमात वाढ हाेईल. कुटुंबीयांची कृपा व प्रेम तुम्हाला लाभणार आहे. नवे संबंध जाेडाल. प्रेमप्रसंगात माधुर्य राहणार आहे. मित्रांसाेबत मनाेरंजनाच्या वातावरणात वेळ घालवाल.
 
आराेग्य : या आठवड्यात कफासंबंधित राेग त्रास देऊ शकताे. जुनाट व्याधी संपुष्टात येईल. वाताचा त्रास संपेल. आळस आणि थकवा जाणवेल.मार-दुखापत लागू शकते. वाहन जपून चालवावे. स्वत:च्या आराेग्याचा विचार करताना अतिआत्मविश्वासी राहू नये. मन एकाग्र राखावे.
 
शुभदिनांक : 13, 15, 19
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात अल्काेहाेल घेऊन वाहन चालवू नये. सीटबेल्ट, हेल्मेट लावून आपल्या लेनमध्ये चालावे. रेस ड्रायव्हिंग टाळावे.
 
उपाय : या आठवड्यात लाल कापडात गहू व गूळ बांधून एखाद्या गरजवंताला दान केल्यास सर्व इच्छा पूर्ण हाेतील.