सांध्यांमध्ये वेदना का जाणवतात?

    13-Sep-2020
Total Views |
 
zdhzdhr_1  H x
 
जसंजसं वय वाढतं, तशा वेदना वाढायला लागतात. म्हणूनच आर्थराइटिसला म्हातारपणाच्या सुरूवातीची प्रक्रिया मानलं जातं. यामागे काही अनुवंशिक आणि जीवनशैलीशी निगडित कारणं आहेत.अनुवंशिक कारणांवर काहीच उपाय नाही.पण काही गाेष्टी मात्र आपल्या हातात नक्कीच आहेत, त्यापैकी एक म्हणजे लठ्ठपणाला नियंत्रणात ठेवणं आणि जखमा हाेणार नाहीत याची काळजी घेणं. म्हणून वजन नियंत्रणात ठेवा. आपल्या राहणीमानाचाही सांध्यांवर परिणाम हाेत असताे, म्हणून याेग्य पादत्राणांची निवड करा, जेणेकरून गुडघ्यांवर कमी भार पडेल, व्यायामाद्वारेही तुम्ही पेशींना मजबूत बनवू शकता. काठीच्या आधारे चालण्यानेही आर्थराइटिस हाेण्याची शक्यता लांबवता येते. तसंच तारूण्यावस्थेत गुडघेदुखी, जखमा यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हातारपणी चांगलंच महागात पडू शकतं.दुखणं अधिक बळावल्यास शस्त्रक्रियेद्वारे उपाय करता येताे.