मिथुन

    13-Sep-2020
Total Views |

fjgjdtkdfg_1  H 
 
या आठवड्यात नशिबावर अवलंबून न राहता कामही करावे लागणार आहे.व्यापार-व्यवसायात फायदा हाेईल. व्यापार-व्यवसाय जास्त पसरू नका. वैयक्तिक वा व्यापारी सुखद, यशदायी प्रवासाचा याेग आहे. तात्पुरत्या समस्या व मतभेदांचे निराकरण हाेईल. प्रवास सुखकर असेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थी सहाध्यायींच्या अपेक्षांवर खरे ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. नाेकरीसंबंधित तुमच्या चिंता दूर हाेतील. कारभारात अडलेले धन मिळण्याचा मार्ग माेकळा हाेईल. विद्यार्थीवर्ग अभ्यासाबाबत दक्ष असतील व त्यांना यशही मिळेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात माधुर्य राहील. विशेषत: दांपत्यजीवनात एखादी सुखद बातमी समजू शकेल. आई-वडिलांसाेबत आनंदात वेळ घालवाल.नवीन लाेकांशी संबंध जाेडण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित ओळखून घ्या. मित्रांसाेबत पार्टीसमारंभाचा आनंद लुटाल.
 
आराेग्य : या आठवड्यात रस्ता ओलांडताना सावध राहा. विशेषकरून लाल सिग्नल ओलांडताना विशेष लक्ष ठेवा. एखाद्या बेपर्वाईचा दंड साेसावा लागू शकताे.त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. जुनाट राेगापासून सुटका करून घेण्यात यशस्वी व्हाल. सकाळी उठताच पाणी, दुपारी ताक आणि रात्री दूध प्यावे.
 
शुभदिनांक : 13, 14, 16
 
शुभरंग : भुरा, नारंगी काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात कुसंगत टाळा अन्यथा तुमच्या शिक्षणावर परिणाम हाेऊ शकताे. स्वत:ला उन्मादापासून दूर ठेवा.
 
उपाय : या आठवड्यात गूळ आणि गहू सूर्यदेवाला अर्पण करा व नंतर ते गरजूंना वाटा.