मेष

    13-Sep-2020
Total Views |
 
fjgjdtkdfg_1  H
 
हा आठवडा सुखद, यशस्वी प्रवासाचा याेग बनवील. तात्पुरत्या समस्या व मतभेदांचे निराकरण हाेऊ शकेल. व्यावसायिक प्रवासही फलदायक हाेईल. तरीही तुम्हाला जास्त श्रम करावे लागतील. संततीच्या परीक्षेचे निकाल त्रस्त करू शकतात.अनपेक्षित प्रस्तावांमुळे त्रास जाणवू शकताे.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा विद्यार्थ्यांना अत्यंत उत्तम निकाल देणारा राहील. जर आपण तयारी करीत असाल तर नक्कीच आपण यशस्वी व्हाल. जर एखाद्या सरकारी नाेकरीसाठी तयारी करीत असाल तर आपल्या श्रमाचे चीज हाेईल. व्यवसायासाठी हा काळ प्रगतिकारक असणार आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे दांपत्य जीवन सुखमय राहणार आहे. भावा- बहिणींचे सहकार्य मिळणार आहे. मित्रांसाेबत बाहेर काेठे तरी पार्टी कराल. आईचे सुख मिळेल. नातलगांसाेबत वाद हाेण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वत:ला उत्तम राखण्यासाठी साैंदर्य प्रसाधनांचा आधार घेऊ शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात एखाद्या मुद्यावर मतप्रदर्शन करताना जास्त उत्तेजित हाेऊ नये. अवाजवी विश्रांतीमुळेही शरीरात आळस व अस्वस्थता राहील. आपल्या तणावाचा परिणाम आपल्या नात्यांवर हाेऊ शकताे. आहारात अनियमितपणा ठेवू नका. मांसाहार व जडान्न टाळा.
 
शुभदिनांक : 13, 14, 19
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात नवीन काम निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा भविष्यात एखादी समस्या उद्भवू शकते.
 
उपाय : या आठवड्यात गरीबांना कांबळे व ब्राह्मणांना खिचडी व तीळगूळाचे पात्र भरून दान केल्यास शुभफल मिळते.