मीन.

    13-Sep-2020
Total Views |


fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात व्यावसायिक व्यवहार फायदेशीर राहणार आहेत. नियाेजनानुसार काम करावे. धनलाभ हाेईल. याेग्य-अयाेग्यचा निर्णय घेण्यात घाई करू नये.अडलेले पैसे मिळतील. प्राॅपर्टीमधून तुमचा फायदा हाेईल. आत्मविश्वास वाढेल.थाेड्याशा श्रमात भरपूर फायदा हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यापार-व्यवसायात अनायास लाभाचे याेग आहेत. एखाद्या माहितीमुळे प्रसन्नता लाभेल. इतरांचे पाहून काेणतेही काम करू नये. नाेकरदारांना पदाेन्नती मिळण्याचे याेग आहेत. व्यावसायिकांना थाेड्याशा परिश्रमात जास्त आर्थिक लाभ हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात बाहेरील कामांमध्ये व्यस्त असूनही घरच्यांना वेळ देऊ शकाल. स्वत:वर प्रेम कराल. विशिष्ट मित्रांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे तुमचे मन बळकट राहील. स्वत:चे मानसिक विचार व त्रास कुटुंबीयांना सांगाल.बंधुंशी असलेले भांडण मिटेल.
 
आराेग्य : या आठवड्यात रात्री उशीरपर्यंत जागण्याची सवय साेडावी अन्यथा निद्रानाशाचा त्रास हाेऊ शकताे. दिनचर्या व्यवस्थित राखावी. अव्यवस्थित जीवनशैली तब्बेतीवर परिणाम करू शकते. त्यामुळे पाेटाचे विकार संभवतात. पायांत वेदना व थकवा जाणवू शकताे. सकाळी बेल खावा.
 
शुभदिनांक : 13, 14, 19
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात अनावश्यक खर्च हाेऊ शकताे. सावध राहावे. या दरम्यान मित्र व सहकाऱ्यांसाेबत डिलिंगमध्ये सावध राहावे.
 
उपाय : या आठवड्यात सुवासिनीला साैभाग्याचा चुडा दान करावा. नित्यनेमाने पांढऱ्या गायीला ताजे गवत खाऊ घातल्यास घर-कुटुंबातील दाेष दूर हाेतील.