मकर

    13-Sep-2020
Total Views |

fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात बाेलण्यावर ताबा ठेवा. एखाद्याशी वाद हाेण्याची शक्यता आहे.नकाे त्या कामात पैसा खर्च हाेईल. सर्व याेजना अनुकूल हाेतील. इतरांमुळे विनासायास प्रगती हाेईल. शत्रूंचा नाश हाेईल व तुमचा विजय हाेईल. शेतीद्वारे फायदा हाेईल. धार्मिक कार्यांत वाढ हाेईल. प्रवासात त्रास हाेऊ शकताे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात बेराेजगार व्यक्तींना धावपळ करावी लागू शकते. प्राॅपर्टी वा शेअर विकण्यासंबंधित प्रकरणात दक्षता बाळगावी.व्यापार-उद्याेगात प्रगतीचा याेग आहे. आर्थिक स्थिती पूर्णपणे अनुकूल राहील.नाेकरदारांना वरिष्ठांकडून अनुकूल वातावरण लाभेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात बाहेरील कामांमध्ये व्यस्त असूनही घरच्यांना वेळ देऊ शकाल. स्वत:वर प्रेम कराल. विशिष्ट मित्रांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे तुमचे मन बळकट राहील. स्वत:चे मानसिक विचार व त्रास कुटुंबीयांना सांगाल.बंधुंशी असलेले भांडण मिटेल.
 
आराेग्य : या आठवड्यात तब्बेतीबाबत निष्काळजी राहणे याेग्य ठरणार नाही. जुनाट राेग वाढू शकताे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे. आठवडाअखेरीस अ‍ॅसिडिटी हाेऊ शकते. जास्त मसालेदार खाणे टाळावे कारण त्यामुळे पाेटाचे आजार हाेण्याची शक्यता आहे. सकाळी मध व लिंबू सेवन करावे.
 
  शुभदिनांक : 13, 14, 16
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात जुनी प्रेयसी तुमची प्रतिष्ठा दुखावण्याचा प्रयत्न करू शकते. यासाठी सावध राहावे.
 
उपाय : या आठवड्यात तांब्याच्या लाेट्यात पाणी भरावे व ते घराच्या पूर्व भागात शिंपडावे. यामुळे शुभवार्ता कळते.