कुंभ

    13-Sep-2020
Total Views |

fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात आई-वडिलांचा आदर करावा. व्यापारात नव्या संधी मिळतील. एखादी इच्छित वस्तू प्राप्त हाेईल. शुभ व मंगल कार्य हाेईल. भागीदारासाेबतच्या गैरसमजांचे निराकरण हाेईल. मानसिक शक्ती वाढेल. कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमाविषयी चर्चा हाेईल. राग टाळावा व मन शांत ठेवावे.
 
नाेकरी/व्यवसाय : नाेकरदार व्यक्तींची बदली हाेण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद हाेत राहील. व्यापारी वर्गात व्यापारात बदल हाेण्याची शक्यता राहील. जे लाेक अद्याप आपल्या व्यवसायात यशस्वी हाेऊ शकलेले नसतील ते व्यवसाय यशस्वी करण्याच्या प्रयत्नात राहतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात वैवाहिक जीवनात माधुर्य असेल. अनावश्यक वाद टाळाल तर घरातील वातावरण आनंदी राखू शकाल. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्बेतीकडे लक्ष द्यावे. नवीन लाेकांशी मैत्री करण्यापूर्वी त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
 
आराेग्य : तुम्ही थाेडा वेळ कुटुंबीयांसाेबत घालवावा कारण घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्बेत बिघडू शकते. तुम्हाला पायदुखीपासून आराम मिळेल. वाहन दक्षतेने चालवावे. कफासंबंधित राेग त्रास देऊ शकताे. जुनाट आजार संपुष्टत येतील.
सकाळी मध आणि लिंबाचे सेवन करावे.
 
शुभदिनांक : 13, 14, 16
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात नवीन काम निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा भविष्यात एखादी समस्या उद्भवू शकते.
 
उपाय : या आठवड्यात कबुतरांना ज्वारी खाऊ घालावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येईल व कुटुंबात शांती राहील.