कर्क

    13-Sep-2020
Total Views |

fjgjdtkdfg_1  H 
 
या आठवड्यात आर्थिक प्रकरणे सुटतील. भाग्यावर अवलंबून न राहता कामही करावे लागेल. व्यापारात आणि व्यवसायात फायदा हाेईल. बेराेजगारांना राेजगार मिळेल. व्यापारात नवे साैदे मिळतील. कर्जसंबंधित समस्यांचे समाधान हाेईल.विद्यार्थ्यांना यश मिळेल. संततीसुख लाभेल.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ आहे.विद्यार्थ्यांनी मित्रांवर विसंबून राहू नये व आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे.त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ अवश्य मिळणार आहे. नाेकरदारांसाठी हा आठवडा भरपूर प्रमाणात धावपळीचा राहणार आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य लाभणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या भावा-बहिणींची भेट हाेणार आहे. पती-पत्नीत थाेडी कुरबूर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक त्रास हाेणार आहे.संततीसुख लाभणार आहे. कुटुंबीयांशी आपुलकीचे संबंध राहतील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला अंगदुखी, पाेटदुखी यासारख्या आजारांवर लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक रुपाने विशेष त्रास राहणार नाही. तरीही तब्बेतीविषयी बेपर्वा राहू नये. राेग असल्यास आवश्यक औषध व उपचार अवश्य घ्यावेत. रागावू नये. मन शांत राखावे. माेसमी फळे खावीत.
 
शुभदिनांक : 13, 14, 19
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात अनुभवींचा सल्ला डावलू नये अन्यथा तुमचा निर्णय चुकून पश्चाताप करावा लागू शकताे.
 
उपाय : सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यावा. त्यानंतर पूर्वेकडे ताेंड करून कुशासनावर बसून रुद्राक्ष माळेने सूर्यमंत्राचा जप करावा.