भेटीसाठी कार्यालयात गर्दी करू नका : आयुक्त कृष्ण प्रकाश

    13-Sep-2020
Total Views |
 
bzdh_1  H x W:
 
चिंचवड, 12 सप्टेंबर (वि.प्र.) : पाेलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड पाेलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या भेटीसाठी अनेक राजकीय व्यक्ती, पदाधिकारी, नागरिक गर्दी करत आहेत. पाेलीस आयुक्तालयात काेराेनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन हाेत नसल्याचे निदर्शनास आल्याने पाेलीस आयुक्तांच्या सदिच्छा भेटीसाठी येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.पिंपरी-चिंचवड पाेलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पाेलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, राजकीय व्यक्ती, पदाधिकारी आणि नागरिकही त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सध्या सर्व जण आपापल्या परीने पाेलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना भेटण्याचा आटापिटा करत आहेत. हे सर्व पाहता शिस्तप्रिय कृष्ण प्रकाश यांनी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन हाेत नसल्याचे लक्षात येताच नागरिक आणि इतर राजकीय व्यक्तींनी सदिच्छा भेट न घेण्याचे फर्मान साेडले आहे. असे पत्रकच जनसंपर्काद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.या पत्रकामध्ये साेशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे म्हटले असून, अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास रविवार आणि सरकारी सुट्टी वगळता सायंकाळी 4 ते 6 या वेळेत भेटावे, असे म्हटले आहे, अशी माहिती सहायक पाेलीस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी आर. आर. पाटील यांनी दिली.