धनु

    13-Sep-2020
Total Views |

fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात अघिकारी वर्गाशी मैत्री लाभदायक राहील. व्यापारात बेपर्वा राहू नये. परस्पर विश्वास आणि सामंजस्याने कामे पूर्ण हाेऊ शकतील. मानसिक ताण टाळण्यासाठी याेग व ध्यानाचा मार्ग अवलंबावा. व्यवसायात वाढ हाेण्याची व उत्पन्नाचे नवे स्राेत मिळण्याची शक्यता आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थ्यांना याेग्य दिशेने केलेल्या परिश्रमाचा फायदा हाेणार आहे. इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा हाेईल.करियरला याेय दिशा देण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नाेकरीत पदाेन्नतीचे याेग आहेत. आर्थिक चिंता संपुष्टात येतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन चढ-उताराचे राहणार आहे.जाेडीदाराच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे. संततीकडून एखादी विशेष शुभवार्ता समजू शकते. एखाद्या वडीलधाऱ्याशी असलेला संपत्ती वा जमिनीचा वाद सुटू शकताे. बंधु व मित्रांशी मधुर संबंध राहतील.
 
आराेग्य : या आठवड्यात मानसिक थकवा आणि दातांविषयी तक्रार असू शकते.चिंता आणि शंकाकुशंकांचा अंत हाेईल. मन उत्साही राहील. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. डाेळे व डाेके दुखण्याची शक्यता आहे. सकाळच्या नाश्त्यात गूळ व फुटाणे खावेत.
 
शुभदिनांक : 13, 14, 19
 
शुभरंग : लाल, पांढरा, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवारर
 
दक्षता : या आठवड्यात काैटुंबिक समस्यांनी मन विचलित हाेऊ शकते. संततीचे अपयश त्रस्त करू शकते. मन शांत राखावे.
 
उपाय : या आठवड्यात नित्यनेमाने उत्तर दिशेला ताजे गवत गायीला खाण्यासाठी ठेवावे. गरीब गरजूंना मूग व गूळ दान करावे.