सुतार जसे लाकडाचे काम करताे, तसा हा पक्षी झाडात घरटे काेरताे. म्हणून या पक्ष्याला सुतारपक्षी असे नाव पडले. सुतारपक्षी मुख्यतः झाडाच्या खाेडांवर आणि फांद्यांवर कीटकांचं भक्षण करतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या चाेचीने विशिष्ट प्रकारचा आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात.साेनेरी पाठीचा सुतारपक्षी भारतात सर्वत्र आढळताे.जंगलांत, झाडाझुडपांत, आमराईत व फळझाडांच्या किंवा नारळीच्या बागांत याचा वावर जास्त असताे. सुतारपक्षी बहुधा झाडांवरच असताे. पायाच्या बाेटांवर असलेल्या अणकुचीदार नखांनी खाेडाला घट्ट धरून ताे झरझर वर चढून जाऊ शकताे. सुतारपक्ष्याला एकट्याला राहायला आवडतं.