50 मजुरांच्या मुलांची फी कर्नाटकातील शिक्षकांनी भरली

    12-Sep-2020
Total Views |
dfghkj_1  H x W
 
बेळगाव, 11 सप्टेंबर (आ.प्र.) : 5 सप्टेंबरला देशभर शिक्षकदिन साजरा झाला. माजी राष्ट्रपती स्व.डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकांविषयी कृतज्ञता व्य्नत करण्यासाठी शिक्षकदिन साजरा केला जाताे. कारण डाॅ. राधाकृष्णन शिक्षक हाेते. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक कसे धाऊन येतात, याची जाणीव करून देणारी घटना काेराेनाकाळात समाेर आली आहे.काेराेनामुळे गरीब लाेक आर्थिक संकटात असूनही आज देशात असे अनेक शाळा-काॅलेज जे फी भरली नाही तर मुलांना ऑनलाइन क्लास मध्ये प्रवेश देत नाहीत. परंतु कर्नाटकमधील एफ.एम. डबली. आर्ट्स काॅलेजच्या 11 शिक्षकांनी 50 गरीब मुलांची फी भरून त्यांना काॅलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. याची माहिती मिळताच शेकडाे मुलांनी साेशल मीडियावर या शिक्षकांची प्रशंसा करून गुरूंचे ऋण कधीच फेडता येणार नाही, अशी प्रतिक्रिया व्य्नत केली आहे.या शिक्षकांनी र्नकम गाेळा करून या गरीब विद्यार्थ्यांची प्रतिविद्यार्थी 3000 रु. अशी एकूण 1 लाख 50 हजार रु.फी भरून समाजा समाेर एक नवा आदर्श ठेवला आहे. कारण या विद्यार्थ्यांचे पालक राेजंदारीवर मजुरी करून उपजीविका करतात. लाॅकडाऊनमुळे या अनेक गरिबांना कित्येक दिवस मजुरीसुद्धा मिळाली नाही. अशा स्थितीत आम्ही शिकण्याची आशाच साेडली हाेती.पण आमच्या गुरूंमुळे आम्हाला आता काॅलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे राेहिणी देवेगाैडा या विद्यार्थिनीने आणि शरनु नावाच्या विद्यार्थ्यांने मत व्य्नत केले.हे शिक्षक नुसती फी भरूनच थांबले नाहीत, तर या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तुमची फी भरली आहे व तुम्हाला काॅलेजात प्रवेश मिळाल्याचे सांगितले.या सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.