~आयुष्य हे सुव्यस्थित एका सरळ रेषेप्रमाणे असावे असे मला वाटते पण, त्याऐवजी ते गुंतागुंतीचे आणि गाेंधळाचे आहे.
~मला मिळालेली प्रत्येक चांगली गाेष्टी ही माझ्याकडे सुदैवाने किंवा चुकीमुळे आलेली आहे. माेठ्या चुकीमुळे माेठे नुकसान हाेते आणि शेवटी काहीतरी चमकदार घडते.
~मला समजल्याप्रमाणे आपली ध्येये आपल्याला दिसत नाहीत. जगण्याच्या सगळ्या गाेंधळात आपले नशीब ध्येयावरील एक-एक पापुद्रा काढत जाते.
~उदारपणे वागा. पैशाने आणि दुसऱ्यांना गृहीत धरण्याबाबतही.
~जा आणि काहीतरी निर्मिती करा.
~खाेटारडेपणाला साेडचिठ्ठी देण्याची सवय लावून घ्या. अगदी कुणाला वाचवण्यासाठीदेखील खाेटे बाेलू नका.
~तुम्हांला भीती वाटते अशा बहुतेक गाेष्टी धाेकादायक नसतात.
~गाेंधळात न पडता शिकत रहा.
~अनेक गाेष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नसतात. स्वतःला प्रश्न विचारून त्या किती महत्त्वाच्या आहेत किंवा कमी महत्त्वाच्या आहेत हे ठरवा.
~तुम्हांला शक्य तितके सर्वाेत्कृष्ट काम करा. ते परिपूर्ण नसेलही. रिझल्ट काय आहे यापेक्षा तुमचे प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
~तुमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या.
~त्यांच्यासाठी हजर रहा. तुमच्यासाठी ते असतील. त्यांच्याशी चांगला संवाद ठेवा. त्यांना आनंदी ठेवा.
~तुम्ही कुणालाही बदलू शकत नाही किंवा कुणाची हमी घेऊ शकत नाही. तुम्ही कुणालाही कसेही घडवू शकत नाही.
~त्यांच्यामध्ये सुधारण्याचे प्रयत्न करू शकता, त्यांना आनंदी ठेवू शकता.