कलाविषयक अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

    11-Sep-2020
Total Views |

dstyu_1  H x W:
 
मुंबई, 10 सप्टेंबर (आ.प्र.) : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका, प्रमाणपत्र कलाविषयक अभ्यासक्रम (मूलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. प्रवेशाचे निकष  www.doa. org.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मूलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावर ऑनलाइन नाेंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या छायाप्रती (स्कॅन) अपलाेड करणे यासाठी 9 ते 19 सप्टेंबर, अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या 22 सप्टेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास 23 सप्टेंबरला सादर करता येतील. 24 सप्टेंबरला विद्यार्थ्यांसाठी अंतिम यादी प्रसिद्ध हाेणार आहे. संबंधित महाविद्यालयात 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचे कला संचालनालयाने कळवले आहे.