सुतार पक्ष्याच्या देखण्या रंगामुळे आणि त्याच्या चाेचीमुळे ताे एकदा बघितला तरी चांगलाच लक्षात राहताे. या पक्ष्याचा मुख्य रंग पिंगट असताे. त्याच्या पाठीवर, पंखावर आणि शेपटीवर झेब्रा प्राण्यासारखे काळेपांढरे पट्टे असतात.सुतार पक्षी हा झाडामध्ये चाेचीने बिळ तयार करणारा पक्षी, सुतार जसे लाकडाचे काम करताे तसे हा पक्षी झाडात बिळ पाडण्याचे काम करताे म्हणून या पक्ष्याला सुतार पक्षी असे नाव पडले.सुतार पक्ष्याच्या डाे्नयावर पिसांचा तुरा असताे. या तुऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला ताे तुरा उघडता किंवा मिटत येताे. सुतार पक्ष्याची चाेच लांब किंवा बाकदार असते.हा पक्षी हु..पाे...पाे असा आवाज करताे.हेच त्याचे गाणे असते. याच्या आवाजावरून याला इंग्रजीत हुप्पाे नाव पडले असावे.त्याचे गाणे एकेवेळी 10 मिनिटे तरी चालते.गावाजवळची माळराने, गवताळ भाग, तसंच जंगलात हे पक्षी फिरताना दिसतात. सुतार पक्ष्याचे मुख्य अन्न हे अळ्या किंवा कळ्यांचे काेष आहेत. या अळ्यांच्या शाेधात हे पक्षी झाडावर किंवा जमिनीवर चाेच आपटत व पालापाचाेळा दूर करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यांची चाेच त्यांना त्याचं भक्ष्य शाेधायला मदत करते. म्हणूनच निसर्गाने त्यांना लांब चाेचीची देणगी दिली आहे. हा पक्षी सहसा जाेडीने किंवा टाेळीने राहताे. झाडांच्या ढाेलीत हा घरटे करताे.