
वेद, उपनिषदे यांची महती माेठीच आहे. पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वेदांतील कर्मकांड स्वर्गसुख मिळवून देणारे आहे. ज्ञानेश्वर यावर भाष्य करताना सांगतात की, वेदातील रजतमात्मक भाग सुखदु:ख प्राप्ती करून देणारा असल्याकारणाने अर्जुनाने त्याकडे लक्ष देऊ नये. तीनही गुणांचा त्याने अव्हेर करावा.मी व माझे असा भाव मनात न ठेवता आनंदात मग्न असावे. वेदांनी विविध मार्ग सांगितले असले तरी आपल्याला हितकर असेल ताेच मार्ग आपण पत्करावा.सूर्याेदय झाल्यानंतर सर्व मार्ग स्पष्ट हाेतात, पण अर्जुना, आपण हव्या असलेल्या मागानेच जाताे, हे खरे ना? सर्व पृथ्वीवर केवढे तरी पाणी आहे, तरी ते आपण आपणांस हवे तेवढेच घेताे ना ? त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष वेदांच्या उपदेशाचा विचार करतात आणि त्यातील अविनाशी तत्त्वाचाच स्वीकार करतात.
म्हणून अर्जुना, मी काय सांगताे ते नीट ऐक. नीट विचार केल्यावर तुझ्या ध्यानात येईल की, स्वधर्मरूपी युद्ध करणे हेच याेग्य आहे. असे तुझ्या मनास पटत असेल तर तू आपले विहित कर्म साेडू नकाेस. आणि हे कर्म करीत असताना फलप्राप्तीचा मात्र लाेभ थाेडासुद्धा धरू नकाेस आणि कर्मचाही त्याग करू नकाेस. फळाबद्दल मनता इच्छा न ठेवता धर्मक्रिया आचरणे हेच याेग्य आहे. इतके सांगून भगवान म्हणतात की, अर्जुना, तू कर्मयाेगमुक्त हाे. फळाची अपेक्षा साेडून दे आणि चित्त लावून कर्माचे आचरण कर.
कर्म पूर्ण झाले तर त्यायाेगे ार आनंद मानण्याचे कारण नाही. किंवा ते अपुरे राहिले तर असंताेष किंवा दु:ख मानण्याचा विचार करू नकाेस. कर्म सिद्धीस गेले नाही तरी ते सफल झाले असेच मानावे.