~करवंदात 80 ट्नके पाणी असते. पिकलेली फळे भूक वाढवणारी असतात.
~या फळात लाेहाचे प्रमाण जास्त असल्याने अॅनिमिया असणाऱ्या रुग्णांना हे फळ लाभदायी ठरतं.
~करवंद हा रानमेवा आराेग्यासाठी चांगला असताे.
~करवंदात फायबर माेठ्या प्रमाणात असतं.
~मळमळ आणि उलटी हाेत असेल तर करवंद अतिशय उपयुक्त आहे.
~यात क जीवनसत्त्व असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. क जीवनसत्त्वामुळे राेगप्रतिकार श्नती देखील वाढते.
~करवंदाची पाने देखील औषधीयु्नत आहेत. ही पाने मधात बारीक करून खाल्ल्यास काेरडा खाेकला नाहिसा हाेताे.
~करवंदामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांच्या विकारामध्ये करवंद खाण्याने फायदा हाेताे.
~छातीत जळजळ हाेत असेल तर करवंदाचे सरबत थाेड्या थाेड्या वेळाने पीत राहावे.
~वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लाेणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.
~उन्हामुळे दाह हाेत असेल तर करवंदाचे सरबत थाेड्या थाेड्या वेळाने पीत रावावे.
~करवंदाना मीठ लावून सुकवून त्याचा वर्षभर खाण्यासाठी वापर करता येताे.
~करवंदामध्ये सायट्रिक अॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे हाेणारे विकार करवंद खाल्ल्याने कमी हाेतात.