वृषभ

Sandyanand    09-Aug-2020
Total Views |
 
ssssssssss_1  H
 
या आठवड्यात तुम्हाला नात्यांचे सुख उत्तम मिळेल. कामकाजातही सुरुवात उत्तम राहील. देवभक्ती व आध्यात्मिकतेमुळे मन:शांती लाभेल. तुम्ही नवे काम सुरू करू शकता. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी तुम्ही सक्रिय राहाल.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्याचा प्रारंभीचा काळ वगळता महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता. व्यावसायिक आघाडीवर तुमची स्थिती उत्तम असेल. भागिदारी व नव्या करारांसाठी उत्तरार्धातील काळ उत्तम असेल. नोकरीतही तुम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम कराल.
नातीगोती :
या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रिय पात्राला जास्त चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला दांपत्यसुखही उत्तम लाभेल. तुमच्यामध्ये आकर्षण वाढेल, पण नाते टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. मानसिक गोंधळाची स्थिती असल्यामुळे भेट व प्रपोजल टाळावे.
आरोग्य :
तुमच्या तब्बेतीबाबत सांगायचे तर सुरुवातीला थोडे लक्ष द्यायला हवे. आळस, अस्वस्थता, मानसिक तणाव, इ.चा परिणाम तुमच्यावर स्पष्ट दिसून येईल. अखेरच्या दोन दिवसांत तोंड येणे वा तोंडाविषयी काही तक्रार उद्भवू शकते.
शुभदिनांक : १०, १२, १५
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता :
या आठवड्यात आपल्याला जे करायचे आहे त्याची विचारपूर्वक निवड करा व प्रामाणिकपणे त्यावर काम करा.
उपाय :
घोड्याची नाल पिंपळाला स्पर्शून मुख्य दारावर लावावी. व्यापार मंदावला असेल तर शनिवारी मडक्यावर  झाकण लावून टेपने बंद करून दुकानात ठेवा बुधवारी सकाळी झाकण न उघडता वाहत्या पाण्यात ते मडके सोडून द्या.