वृश्चिक

09 Aug 2020 10:40:51
 
ssdsds_1  H x W
 
या आठवड्यात महत्त्वाची कामे वेळेपूर्वीच पूर्ण करून घ्यावीत. कामात सक्रियता दाखवावी. विलंब केल्यास काही योजना अर्धवट राहू शकतात. कोणत्याही प्रकारच्या लोभापायी आपल्या विचारांमध्ये बदल करू नयेत. कौटुंबिक सदस्य तुमचे मनोधैर्य वाढवतील. मित्रांच्या सकारात्मक प्रतिक्रियेने उत्साह राहील.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्यात वरिष्ठांच्या आणि घरातील ज्येष्ठांच्या सहकार्याने तुमची प्रगती होईल. वडिलोपार्जित व्यवसायात असणाऱ्यांनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसाय व कुटुंबात सामंजस्य राखावे. आठवड्याच्या शेवटी सहकाऱ्यांकडून कमी मदत मिळेल. नातीगोती :
हा आठवडा प्रेमसंबंध व नात्यासाठी उत्तम असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत सुखद काळ घालवाल. यानंतर कामाच्या व्यापामुळे जोडीदारासाठी वेळ काढणे कठीण जाणार आहे. या आठवड्यात एखाद्याला प्रपोज करण्याचेही ठरवू शकता .
आरोग्य :
या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम असेल. आठवड्याची सुरुवात चांगली असेल पण मधल्या काळात आपले वागणे काहीसे नकारात्मक होऊ शकते. आठवड्याच्या अखेरीस डोकेदुखी वा छोटीशी समस्या उद्भवू शकते. ज्यांना पूर्वीपासून लिव्हरला सूज, डायबिटीसचा त्रास असेल त्यांनी जपावे.
शुभदिनांक : ०९, १३, १४
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता :
या आठवड्यात तुमच्या कष्टाचे उत्तम फळ मिळणार आहे. यशासोबत संयम राखल्यास ही स्थितीही टिकून राहील.
उपाय :
या आठवड्यात व्यवसायाच्या ठिकाणी चमकदार व फेंट रंगाची सजावट करावी. दाराऐवजी एखाद्या कोपऱ्यात बसण्याचे स्थान असावे.
Powered By Sangraha 9.0