श्रीगणेशाचा सप्तरंगी टॅटू काढण्याचा तरुण-तरुणींमध्ये ट्रेंड

09 Aug 2020 10:40:55
 
sdf_1  H x W: 0
 
जयपूर, ८ ऑगस्ट (वि.प्र.) : कॉलेजकुमारांपासून तर पाटीमध्ये झिंग आणणारे नृत्य करून लोकांचे आकर्षण बनणाऱ्या तरुणांचे 'टॅटू' हे स्टेटस सॅम्बॅल आहे. सर्वत्र कोरोनाची दहशत असताना तरुणांना भरपूर फावला वेळ मिळत आहे. त्याचा ते टॅटू चितारण्यासाठी वापर करीत आहेत. पूर्वी नक्षी, पक्षी किंवा इतर आकाराचे टॅटू काढत असत. परंतु, आता तरुणांमध्ये त्यांचे आई-वडील, भगवान शंकर, श्रीगणेश किंवा त्यांच्या आराध्य देवी-देवतांचे टॅटू काढण्याचे प्रचलन वाढत असल्याचे टॅटू आटिस्ट भरत खत्री यांनी प्रतिपादन केले आहे. ८०% टॅटूप्रिय तरुण-तरुणी सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन टॅटू चितारून घेत आहेत. जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांमध्ये टॅटू काढण्याची क्रेझ जास्त आहे. कोरोनाची साथ व लॉकडाऊनमुळे तरुणांना टॅटू चितारून घेण्याची संधी मिळाली आहे. कारण टॅटू काढल्यानंतर ६-७ दिवस टॅटूवर ऊन म्हणजे सूर्यप्रकाशात पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. तसेच जिमिग आणि स्वीमिग करता येत नाही. कोरोनामुळे टॅटूची पद्धतच बदलली आहे. इतकेच नव्हेतर डिमांडही बदलली आहे. त्यामुळे कस्टमरला संपूर्ण सॅनिटाईज करावे लागते. त्यासाठी आम्ही सॅनिटायझर टनेल तयार केले आहे. तसेच टॅटू काढताना पूर्ण सावधगिरी बाळगावी लागत आहे. सध्या पॅट्रोट टॅटूचे जास्त प्रचलन आहे. त्यात देवी-देवता, स्वत:चे आई- वडील यांचे पोट्रेट किंवा आकृती, तसेच त्रिशूळ, नाग, शंख आणि धनुष्यबाणाच्या आकृतीचे टॅटू काढण्याचे प्रचलन वाढले आहे. त्यासाठी तरुण-तरुणी ५००० ते ५०,००० रु. पर्यंत खर्च करायला तयार असतात. एक टॅटू काढण्यासाठी ३० ते ४० मिनिटे इतकाच वेळ लागतो. पूर्वी फक्त काळ्या, हिरव्या रंगाचे टॅटू काढले जायचे, आता सप्तरंगी टॅटूचे प्रचलन आहे. हात, गळा, पाठ किंवा पायावरील डाग लपविण्यासाठी आणि केसांना वळण देण्यासाठी, केसांना डिझायनर बनविण्यासाठी टॅटूचा वापर वाढत आहे, असेही भरत खत्री यांनी प्रतिपादन केले. मायक्रोब्लेडिंग  - कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडल्यामुळे लोकांकडे विशेषत: तरुणांकडे भरपूर फावला वेळ आहे. त्यामुळे आता टॅटूसोबतच मायक्रोब्लेडिंगगद्वारे आयब्रो आणि डो्नयावरील केसांना आकार देण्याचे प्रचलन वाढत आहे. यात अतिशय कुशलतेने टॅटू चितारला जातो. दुरून पाहिले तर तो केसांसारखा दिसतो. पांढरे डाग दिसू नयेत यासाठी स्किन कलरचे पिग्मेंटेशन करण्याचा ट्रेंडही वाढत असल्याचे भरत खत्री यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0