सिंह

Sandyanand    09-Aug-2020
Total Views |
 
sadfs_1  H x W:
 
या आठवड्यात घरी व बाहेर श्रम जास्त होतील. खाण्या-पिण्याबाबत निष्काळजी राहू नये. तब्बेतीची काळजी घ्यावी. व्यापाराचा विस्तार होईल. अनावश्यक खर्च जास्त प्रमाणात कराल. सामाजिक कार्यासाठी वेळ द्याल. कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्यात नोकरीत कामकाज आहे तसे चालू राहील. विशेषकरून कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये. नव्या उपक्रमासाठी, नव्या नोकरीसाठी, व्यावसायिक विस्तारासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षेत्रात बोलण्यामुळे काम बिघडणार नाही हे पाहावे.
नातीगोती :
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी एखादी चिंता राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कटू बोलण्यामुळे संबंधात तणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. विशिष्ट मित्रांचे संबंधही संथपणे वाढत राहतील. दूर असणाऱ्या प्रियपात्रासोबत कम्युनिकेशन राखण्यास उत्तम काळ आहे.
आरोग्य :
या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्वचेच्या तक्रारी, अ‍ॅलर्जी, गुप्तांगाचे जुने आजार असणाऱ्या जातकांना उपचाराचा मनाजोगा परिणाम मिळणार नाही. आठवड्याच्या सुरुवातीला दाढदुखी, सांधेदुखी, मज्जातंत्राच्या समस्या सतावू शकतात.
शुभदिनांक : ०९,१३, १५
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता :
या आठवड्यात तुम्हाला कार्यक्षेत्र, व्यवसाय व नात्यांमध्येही दक्षता बाळगायला हवी. थोडीशी चूकही महाग पडू शकते.
उपाय :
या आठवड्यात आर्थिक हानी होत असेल व काहीच उत्तम होत नसेल तर कवड्या हळदीच्या द्रावात भिजवून देव्हाऱ्यात ठेवून लक्ष्मीसोबत त्यांची पूजा करा.