मिथुन

Sandyanand    09-Aug-2020
Total Views |
 
ssssssss_1  H x
 
या आठवड्यात तुम्ही धार्मिक कार्यात  सामील व्हाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला नवे पोजेक्ट मिळेल. व्यापारात लाभाची स्थिती राहील. गुंतवणूक करणे फलदायक ठरेल. कोटकचेरीच्या कामात दिरंगाई होईल. नव्या संबंधांबाबत सावध राहावे. वडिलांच्या तब्बेतीची चिंता राहील.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्यात तुमचे कामकाज संथपणे पण स्थिरपणे चालत राहील. नोकरदारांच्या मार्गात काही लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण कामाविषयीच्या समर्पणाच्या भावनेमुळे तुम्ही टिकून राहाल. व्यावसायिकांना नवे काम वा नवी सुरुवात करण्याची घाई असेल.
नातीगोती :
तुमच्या प्रेमसंबंधात जी प्रतिकूलता होती ती या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या दुपारपासून दूर होइ्रल. तुमचे दांपत्यजीवन खूपच सुखमय राहील. त्यासाठी तुम्ही तुमच्या नात्यांबाबत उत्साही राहण्याची गरज आहे.
आरोग्य :
या आठवड्यात तुमच्या तब्बेतीत काहीशी चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात तुमचे आरोग्य सामान्य राहील. दात, हिरड्या, खांदेदुखी, इ.चा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्वचेसंबंधित व मज्जासंस्थेसंबंधित विकार असल्यास सावध राहावे. शुभदिनांक : १०, १२, १५
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता :
या आठवड्यात कोणतीही योजना बनवण्यापूर्वी तुमचे बजेट नियंत्रित ठेवा.
उपाय :
या आठवड्यात कार्यस्थळावर असे बसा की, आपल्या पुढील जागा मोकळी असावी. एखादा कोपरा वा बंद दार नसावे. शनिवारी दारी आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हातांनी परत पाठवू नये.